Posts

अकिरा कुरोसावा ( १९१० ते १९९९८ ) आणि तारे जमीन पर ( २००७ )

दुनिया मे ऐसे ऐसे हिरे पैदा हुए जिन्होने दुनिया का नक्षा हि बदल दिया क्यो कि वो दुनिया को अपनी नजर से देख पाए . दिमाग उनके जरा हटके थे आसपास वालो को बरदाश्त नही हुआ तकलीफे खडी कर दि लेकीन उसके बावजुद वो जिते और ऐसे जिते कि दुनिया देखती रह गयी “तारे जमीन पर” २००७ सालचा आमीर खान निर्मित आणि दिग्दर्शित व   अमोल गुप्ते लिखित   एक   अविस्मणीय चित्रपट. या चित्रपटाचे   प्रेरणास्थान अकीरा कुरोसावा या जपान मधील प्रतिभावंत दिग्दर्शकाच्या बालपणात आहे असे   वाचनात   आले होते. आणि त्याचमुळे त्याच्या संबधातील माहिती वाचण्याबाबतचे कुतूहल मनात जागृत झाले. सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि निलांबरी जोशी यांनी त्यांच्या लाईम लाईट या पुस्तकात अकिरा कुरोसावा बद्दल   लिहिलेला सविस्तर लेख वाचनात आला आणि आपल्या कर्तुत्वाचा ठसा संपूर्ण जगात उमटवणार्या या दिग्दर्शकाचे बालपण किती दयनीय होते हे लक्षात आले.  अकिरा कुरोसावा जपान मधील   “मोरीमुरा गाकूएन”   या शाळेतला मंद विद्यार्थी. बालपणाचा कठीण प्रवास पार करून नंतर आयुष्याच्या एका टप्प्यावर तो पोचला पण त्या कटू स्मृती   शेवटपर्यत त्याच्या मनात